Image Alt

Zeal Silver Crest

  /  Events   /  SCS – MAHARASHTRA DAY CELEBRATION

SCS – MAHARASHTRA DAY CELEBRATION

मंगल देशा पवित्र  देशा दगडांच्या देशा. प्रणाम घ्यावा  माझा हा श्री महाराष्ट्र  देशा…आज महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने झील एज्युकेशन सोसायटीच्या सिल्व्हर क्रेस्ट स्कूल  मध्ये उत्साहाचे आनंदाचे वातावरण होते. आज विद्यार्थ्यांकडून विविध कलागुणांद्वारे  महाराष्ट्राला मानवंदना देण्यात आली. पोवाडा, समूहगीत, नृत्याविष्कार अश्या विविधतेने आपल्या प्रदेशाचे कौतुक  केले गेले. या प्रसंगी शाळेचे संस्थापक श्री. काटकर सर, सचिव  श्री. जयेश काटकर सर तसेच प्राचार्या सौ. अनुजा येरुडकर मॅडम आणि सिल्व्हर क्रेस्ट काॅलेजात च्या प्राचार्या जयश्री मॅडम  उपस्थित  होत्या. त्यांनी सर्वाना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या.