
मराठी भाषा गौरव दिन!!
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी .. हाच कौतुकाचा सोहळा आज झील एज्युकेशन सोसायटीच्या सिल्व्हर क्रेस्ट स्कूल मधे साजरा झाला . कुसुमाग्रजांचे स्मरण करुन प्राचार्या सौ. अनुजा येरुडकर मॅडम यांच्या हस्ते सरस्वती आणि ग्रंथपुजन केले . विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र गीत आणि मराठी गीत गाऊन मराठी भाषेप्रती कृतज्ञता व्यक्त केली. भाषा फाउंडेशन तर्फे घेतली जाणारी मराठी भाषा ऑलिम्पियाड परीक्षा शाळेत घेण्यात आली होती . त्यात 123 विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले .त्यांना प्रशस्तीपत्रक देऊन प्राचार्या अनुजा मॅडम यांनी मुलांचे कौतुक केले . जरी इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेत असलो तरीही मराठी भाषेचा अभिमान बाळगून तिचे रितसर शास्त्रशुद्ध शिक्षण घेऊ अशी शपथ मुलांनी घेतली . शाळेचे संस्थापक माननीय काटकर सर सचिव जयेश काटकर सर तसेच सल्लागार श्री. खांडवे सर यांनी सर्वाना मराठी दिनाच्या शुभेच्छा दिल्या . शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. अनुजा येरुडकर मॅडम यांच्या मार्गदर्शनामुळेच हा कार्यक्रम उत्तम पार पडला .